कामगार उपायुक्त कार्यालयातील दुकाने निरिक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

कामगार उपायुक्त कार्यालयातील दुकाने निरिक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

    नासिक::- उपायुक्त कार्यालयातील दुकाने निरिक्षक आलोसे निशा बाळासाहेब आढाव यांना लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने ताब्यात घेण्यात आले.

          तक्रारदार हे हॉटेल व्यवसायी असून ते नासिक येथे चालवीत असलेल्या हॉटेल मध्ये बालकामगार नोकरीस असल्याची बतावणी करून त्याबद्दल आलोसे यांनी केलेल्या तपासणी दरम्यान त्यांचा नीरंक अहवाल पाठवून त्यांच्यावर बाल कामगार असल्यासंदर्भात गुन्हा दाखल न करण्याच्या मोबदल्यात आढाव यांनी तक्रारदारा कडे पंचासमक्ष ५०००/-रुपये ची लाचेची मागणी करून सदर ५०००/- रुपये लाचेची रक्कम कामगार उपायुक्त कार्यालय, नासिक येथे पंच साक्षीदार समक्ष स्विकारताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले असुन याबाबत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे .
           सापळा अधिकारी अनिल बडगुजर, पोलीस उप अधिक्षक, सापळा पथक पो. ना. मनोज पाटील, पो. ना. अजय गरुड, म.पो.शि. शितल सूर्यवंशी यांनी श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, पोलीस अधीक्षक, माधव रेड्डी, अप्पर पोलिस अधिक्षक, नरेंद्र पवार वाचक, पोलीस उपअधीक्षक, पोलीस  अधीक्षक कार्यालय, ला.प्र.वि. नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कारवाई करण्यात आली..

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विनामूल्य मैफल ! अफलातून म्युझिक लव्हर्सतर्फे सोमवारी सूरसम्राज्ञी लता मैफल !

"राजकारण गेलं मिशीत" या चित्रपटात उद्धव भयवाळ यांची लावणी !

इशरे नाशिक शाखेच्या नवीन कार्यकारिणीने केले पदग्रहण !