पोलिस नाईक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

पोलिस नाईक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

        नासिक/जळगाव::- भुसावळ तालुका पोलिस ठाण्यातील पोलिस नाईक आलोसे गणेश पोपट गव्हाळे याने मोटर चोरीस गेलेल्या शेतकऱ्याच्या नावाने ५,०००/-रुपये व स्वतःसाठी १,०००/-रुपये असे एकुण ६,०००/-रुपये लाच मागितली होती ती स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने ताब्यात घेण्यात आले.

      यातील तक्रारदार यांची भुसावळ तालुका पोलीस स्टेशन हद्दीमधील मांडवा दिगर ता.भुसावळ येथे शेत जमीन आहे. सदर शेतीसाठी लागणारे पाणी हे त्यांनी शेजारच्या शेतकऱ्याच्या विहीरीतून घेण्यासाठी सदर विहीरीत स्वतःच्या मालकीची पाणी ओढण्याची मोटर लावलेली आहे. त्याचप्रमाणे इतर दोन शेतकऱ्यांनी देखील स्वतःच्या मालकीच्या दोन मोटारी लावलेल्या आहेत. सदर विहीरीत असलेल्या तिन मोटारींपैकी एक मोटर चोरीला गेल्याने सदर मोटर चोरीस गेलेल्या शेतकऱ्याने इतर दोघा शेतकऱ्यांनीच त्यांची मोटर चोरी केल्याचा संशय म्हणून भुसावळ तालुका पोलीस स्टेशन येथे त्यांचे विरुद्ध तक्रार केली होती, सदर तक्रारीवर गव्हाळे यांनी तक्रारदार यांचेकडे मोटर चोरीचा गुन्हा दाखल न करण्याच्या मोबदल्यात तक्रारदार यांचेकडे पंचासमक्ष स्वतःसाठी १,०००/-रुपये व ज्यांची मोटर चोरीला गेलेली आहे त्या शेतकऱ्याच्या नावाने ५,०००/-रुपये असे एकुण ६,०००/-रुपये लाचेची मागणी करून सदर लाचेची रक्कम आलोसे यांनी तक्रारदार यांचेकडून पंचासमक्ष स्वतः स्विकारतांना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. त्यांचे वर भुसावळ तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात येत आहे.
            सापळा पर्यवेक्षण अधिकारी अभिषेक पाटील, पोलिस उप अधीक्षक, सापळा व तपास अधिकारी एस.के.बच्छाव, पोलिस निरीक्षक, सापळा पथक स.फौ.दिनेशसिंग पाटील,पो.ना.ईश्वर धनगर, पो.कॉ.राकेश दुसाने, कारवाई मदत पथक एन.एन.जाधव, पोलिस निरीक्षक, स.फौ.सुरेश पाटील, पो.हे.कॉ.सुनिल पाटील, पो.हे.कॉ.रविंद्र घुगे, म.पो.हे.कॉ. शैला धनगर, पो.ना.किशोर महाजन, पो.ना.सुनिल वानखेडे, पो.ना.बाळु मराठे, पो.कॉ.प्रदिप पोळ, पो.कॉ.सचिन चाटे, पो.कॉ.अमोल सुर्यवंशी, पो.कॉ.प्रणेश ठाकुर यांनी श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर मॅडम, पोलीस अधीक्षक, माधव रेड्डी, अप्पर पोलिस अधिक्षक, नरेंद्र पवार, वाचक पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कारवाई करण्यात आली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विनामूल्य मैफल ! अफलातून म्युझिक लव्हर्सतर्फे सोमवारी सूरसम्राज्ञी लता मैफल !

"राजकारण गेलं मिशीत" या चित्रपटात उद्धव भयवाळ यांची लावणी !

इशरे नाशिक शाखेच्या नवीन कार्यकारिणीने केले पदग्रहण !