७००० रुपयांची लाच स्वीकारताना अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

७००० रुपयांची लाच स्वीकारताना अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

नासिक::- धुळे जिल्ह्यातील साक्री तहसील कार्यालयातील वर्ग ३, जैताणे मंडळ अधिकारी विजय वामन बावा यांस लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने ताब्यात घेण्यात आले.

          लाचेचे कारण तक्रारदार यांची मौजे भामेर ता.साक्री येथे गट न.४३ ,४४ अशी शेत जमीन असून त्यांची कौंटुंबिक वाटणी करावयाची असल्याने त्यांनी निजामपूर मंडळ अधिकारी विजय बावा यांची भेट घेतली असता त्यांनी तक्रारदार  यांचे कडे १८००० रु मागणी केली.तडजोडी अंती १५००० रुपये सांगून त्यापैकी अगोदर घेतलेले ८००० रु वजा जाता ७००० रुपये ची पंचांसमक्ष मागणी करून मौजे भामेर ता.साक्री तक्रारदार यांचे राहते घरी ७००० स्विकारतांना आलोसे विजय बावा यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.
            सापळा पर्यवेक्षण अधिकारी अभिषेक पाटील, पोलीस उप अधीक्षक, सापळा अधिकारी प्रकाश झोडगे पोलीस निरीक्षक, सहा.सापळा अधिकारी मंजितसिंग चव्हाण, पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि.धुळे, सापळा पथक राजन कदम, शरद काटके, भूषण खलाणेकर, संतोष पावरा भूषण शेटे, रामदास बारेला, प्रशांत बागुल, मकरंद पाटील, प्रविण पाटील, मपोशी गायत्री पाटील, रोहिणी पवार वनश्री बोरसे, चालक सुधीर मोरे, जगदीश बडगुजर यांनी श्रीमती शर्मिष्ठा वालावलकर पोलीस अधीक्षक, माधव रेड्डी  अपर पोलीस अधीक्षक,  नरेंद्र पवार, वाचक, पोलीस उपअधीक्षक ला.प्र.वि
नाशिक परीक्षेत्र यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कारवाई करण्यात आली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विनामूल्य मैफल ! अफलातून म्युझिक लव्हर्सतर्फे सोमवारी सूरसम्राज्ञी लता मैफल !

इशरे नाशिक शाखेच्या नवीन कार्यकारिणीने केले पदग्रहण !

"राजकारण गेलं मिशीत" या चित्रपटात उद्धव भयवाळ यांची लावणी !