नासिक जि. सरकारी व परिषद कर्म. सह. बँक नि. नासिक निवडणूक -सहकार पॅनेलला सर्वसमावेशक प्रतिसाद !

नासिक जि. सरकारी व परिषद कर्म. सह. बँक नि. नासिक निवडणूक -
सहकार पॅनेलला सर्वसमावेशक प्रतिसाद !

नासिक::- नासिक जिल्हा सरकारी व परिषद कर्मचारी सहकारी बँक नियमित, नासिक बॅंकेच्या २०२३-२८ या पंचवार्षिक निवडणुकीत आरोप-प्रत्यारोपांना सुरूवात झाली असून मतदारांना आकर्षित करण्यासाठी दोन्ही बाजूंनी आटोकाट प्रयत्न केले जात आहेत. 

           सत्ताधारी समता पॅनलचे अनेक विद्यमान संचालक सहकार पॅनेलच्या गोटात आल्याने समता पॅनलला पराभव डोळ्या समोर दिसत असल्याने त्यांनी आता वेगवेगळे डाव आखण्यास सुरवात केलेली आहे असे सहकार पॅनलच्या वतीने सांगण्यात येत आहे. सहकार पॅनेलमधील काही प्रमुख नेत्यांशी संपर्क साधून आमिश दाखवण्यास सुरवात केलेली आहे. "आम्ही तुम्हाला काय कमी केले, आमच्याकडे या, तुम्हाला हवे ते देतो" तसेच रोज सहकार विभागाला सहकार पॅनेलच्या विरोधात मुद्दा शोधून पत्रव्यवहार केला जात असून सहकार पॅनल कसा अडचणीत आणता येईल याबाबत प्रयत्न केले जात आहेत, उच्च न्यायालयात दावा दाखल करण्याचे नियोजन सुद्धा करण्यात येत असल्याची शंका सहकार पॅनेलकडून व्यक्त केली जात आहे. प्रचारावर भर न देता सहकार पॅनल मधील प्रमुख उमेदवारांची फळी नेस्तनाबूत करून समता पॅनल कसा विजयी होईल या बाबत रणनीती आखण्यात समता पॅनल चे नेते व्यस्त आहेत, मात्र सभासदांचा सहकार पॅनेलला मिळत असलेला भरघोस प्रतिसाद पाहता त्यांचा पराभव निश्चित आहे अशी माहिती सहकार पॅनेलकडून देण्यात आली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इशरे नाशिक शाखेच्या नवीन कार्यकारिणीने केले पदग्रहण !

"राजकारण गेलं मिशीत" या चित्रपटात उद्धव भयवाळ यांची लावणी !

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।