श्री. छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्र भूषण सन्मान राज्यस्तरीय पुरस्काराने डी.डी. साळुंके सन्मानित !

श्री. छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्र भूषण सन्मान राज्यस्तरीय पुरस्काराने डी.डी. साळुंके सन्मानित !
न्यूज मसाला वृत्तसेवा नासिक, 7387333801.

               नंदुरबार :- जागतिक पर्यावरण दिन ५ जूनच्या निमित्ताने व महाराष्ट्र शासनाचा वनश्री पुरस्कार प्राप्त, निसर्ग मित्र समितीचा वर्धापन दिनाचे औचित्य साधून पद्मश्री टॉवर हॉल विजय पोलीस कॉलनी, वाडीभोकर रोड, देवपूर धुळे येथे दिमाखदार सोहळा संपन्न झाला. धुळे शहराच्या महापौर, प्रतिभाताई चौधरी, धुळे जि.प.अध्यक्ष आकीॅटेक अश्विनीताई पवार, मुख्य वन संरक्षक धुळे, डिगंबर पवार यांच्या हस्ते डी.डी.साळुंके यांना शैक्षणिक, सामाजिक, पर्यावरण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल सन २०२२-२३ चा श्री. छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्र भूषण राज्यस्तरीय पुरस्काराने  सन्मानित करण्यात आले.

          मागील दोन दशकापासून डी. डी.साळुंके हे श्री. आप्पासो.आ.ध. देवरे माध्यमिक विद्यालय विखरण ता.जि.नंदुरबार विद्यालयात मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत.                       सामाजिक, शैक्षणिक, राष्ट्रीय एकात्मता, पर्यावरण, वृक्ष लागवड व संवर्धन, आपत्ती व्यवस्थापन या क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत यंदाचा सन २०२२-२३ महाराष्ट्र भूषण राज्यस्तरीय पुरस्कारासाठी नंदुरबार जिल्ह्यातून एकमेव अभिनंदनीय निवड करण्यात आली.
             यापूर्वी त्यांना अखिल महाराष्ट्र पत्रकार व पत्रलेखन संघ राष्ट्रीय फेलोशिप पुरस्कार सन - २००८, महात्मा गांधी मिशन ज्ञानप्रसार केंद्र,बीड सन - २००८, ज्ञान विज्ञान,शैक्षणिक संशोधन व विकास केंद्र,पुणे सन -२००९, कुणबी पाटील युवा मंच सन - २०१०, जनगणना आयुक्त कार्यालय गृह मंत्रालय,भारत सरकार सन -२०११, साधना वाचन संस्कृती अभियान,पुणे सन -२०१२, राज्यस्तरीय पर्यावरण परीषद,निसर्ग मित्र पुरस्कार सन-२०१६, शालेय शिक्षण विभाग प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम सन-२०१७, सलाम फाउंडेशन मुंबई सन-२०१७, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण,जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार सन- २०१७ व २०१९, रोटरी क्लब ऑफ,नंदनगरी सन-२०१९, नवनिर्माण सर्व समाज हिताय संस्था सन-२०२०, राज्य रक्त संक्रमण परिषद महाराष्ट्र राज्य सन-२०२२ इ. पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
       

 दिनेश साळुंके हे माजी वनपाल दिलीप साळुंके यांचे चिरंजीव असून मुळगाव शेवाळी ता.साक्री ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला. तसेच संस्थेचे राजेंद्र देवरे विखरण, नाशिंदा, खापरखेडा, बोराळा गावातील ग्रामस्थांनी व श्री. आप्पासो. आ.ध.देवरे विद्यालयाचे शिक्षक शिक्षकेतर बंधू-भगिनींनी अभिनंदन केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विनामूल्य मैफल ! अफलातून म्युझिक लव्हर्सतर्फे सोमवारी सूरसम्राज्ञी लता मैफल !

इशरे नाशिक शाखेच्या नवीन कार्यकारिणीने केले पदग्रहण !

"राजकारण गेलं मिशीत" या चित्रपटात उद्धव भयवाळ यांची लावणी !