लाच स्विकारल्या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम अंतर्गत मे. न्यायालयाने कैदेसह दंडात्मक शिक्षा सुनावली !

लाच स्विकारल्या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम अंतर्गत मे. न्यायालयाने कैदेसह दंडात्मक शिक्षा सुनावली !

         नासिक::- भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम अंतर्गत उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, नंदुरबार येथील तत्कालीन मोटार वाहन निरीक्षक सूर्यभान रेवजी झोडगे, व सहाय्यक रोखपाल वेलजी नहाडिया मावची, यांना गव्हाली चेक पोस्ट वर २०१२ साली लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने ताब्यात घेण्यात आले होते त्या संबंधित अक्कलकुवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता. आलोसे यांना शहादा सत्र न्यायालयात झालेल्या सुनावणीत मे. न्यायालयाकडून अंतिम शिक्षा सुनावण्यात आली.

        भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम कलम ७ अन्वये प्रत्येकी १ वर्ष कैदेची शिक्षा व ५,०००/- रु दंड, कलम १३ (ड) अन्वये प्रत्येकी २ वर्ष कैदेची शिक्षा व  ५,०००/- रुपये दंड ठोठावला.
         वरील नमूद दोन्ही आलोसे हे दिनांक २४/०२/२०१२ रोजी गव्हाली चेक पोस्ट तालुका अक्कलकुवा जिल्हा नंदुरबार येथे कर्तव्यावर होते. यावेळी मूळ तक्रारदार कंटेनर/ ट्रक चालक हे पुणे येथून त्यांच्या कंटेनरमध्ये माल भरून गुजरात राज्यात जात होते. दिनांक २४/०२/२०१२  रोजी मूळ तक्रारदार हे गव्हाली चेक पोस्ट तालुका अक्कलकुवा जिल्हा नंदुरबार येथे आले असता वरील नमूद आलोसे यांनी मूळ तक्रारदार कंटेनर /ट्रक चालक यांच्याकडून त्यांची गाडी गव्हाली चेक पोस्ट मार्गे गुजरात राज्यात जाऊ देण्यासाठी ४,०००/- रुपये लाच एन्ट्रीच्या स्वरूपात मागणी करुन, ४,०००/- रुपये लाच पंचां समक्ष स्वीकारली. याबाबतच्या यशस्वी सापळा कारवाईनंतर अक्कलकुवा पोलीस स्टेशन गुरनं ३००३/२०१२ भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम कलम ७,१२,१३(१)(ई)(ड),१३(२) अन्वये गुन्हा दाखल होता. नमूद गुन्हयाच्या तपासा अंती मा. जिल्हा न्यायाधीश तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश शहादा यांच्या न्यायालयात स्पेशल केस क्रमांक १२/२०१४ अन्वये खटल्याचे कामकाज चालून वरील प्रमाणे दोषसिध्दी मिळाली आहे.
       मे. सी एस दातीर, जिल्हा न्यायाधीश तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश, शहादा यांच्या न्यायालयात शिक्षा सुनावण्यात आली. सरकारी  वकील स्वर्णसिंह गिरासे, सहाय्यक सरकारी वकील तथा सहाय्यक सरकारी अभियोक्ता, शहादा न्यायालय यांच्या कडून या प्रकरणी बाजू मांडण्यात आली होती, 
           तपास अधिकारी ए. जी. वडनेरे, तत्कालीन पोलीस उप अधीक्षक, लाप्रवि नंदुरबार, कोर्ट समन्वय अधिकारी / पैरवी अधिकारी राकेश चौधरी पोलीस उप अधीक्षक, लाप्रवि, नंदुरबार, समाधान वाघ पोलीस निरीक्षक, लाप्रवि, नंदुरबार, पोलीस हवालदार अमोल मराठे, लाप्रवि, नंदुरबार, यांना याकामी श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर पोलीस अधीक्षक, नरेंद्र पवार वाचक, पोलीस उपअधीक्षक, पोलीस अधीक्षक कार्यालय, ला.प्र.वि. नाशिक यांचे मार्गदर्शन मिळाले. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अद्वितीय शास्त्रज्ञ तथा विसाव्या शतकातील महान शास्त्रज्ञ : सर आयझॅक न्यूटन. ४ जानेवारी जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याचा घेतलेला थोडक्यात आढावा वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

सेवानिवृत्त होत असणाऱ्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकाच्या पत्नीचे त्यांच्या आयुष्य भरातील चढ उतार तसेच जडणघडणा विषयीचा लेखाजोखा स्वरूपात मनोगत.... पत्थर खाकर भी खडे रहे! वो लहू बनकर अडे रहे ! जब दुनिया जश्न मनाती है ! तब पुलिस फर्जं निभाती है ! सविस्तर मनोगत वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

मूर्तिकार कारागीरांसाठी कौशल्य विकास आणि उद्योग मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न !