'निसर्गस्पर्श' प्रदर्शनात प्रेक्षकांच्या भेटींनी खुलले जलरंग चित्रण !

'निसर्गस्पर्श' प्रदर्शनात प्रेक्षकांच्या भेटींनी खुलले जलरंग चित्रण !
न्यूज मसाला वृत्तसेवा नासिक, 7387333801.

         नाशिक ( प्रतिनिधी ) - अहमदनगर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कलाशिक्षक असलेल्या चित्रकार संतोष कर्डक यांच्या 'निसर्गस्पर्श' या चित्रप्रदर्शनाचे उदघाट्न काल रविवारी ( दि.१८ ) नाशिकरोडच्या पु. ना. गाडगीळ कलादालनात झाले. उदघाट्क म्हणून ज्येष्ठ चित्रकार प्रा. संजय साबळे उपस्थित होते. ते म्हणाले, माझा विद्यार्थी उत्तम चित्रकार झाल्याचे समाधान वाटते. या प्रदर्शनात जलरंगातील निसर्गचित्रण खुलले आहे. पावसाळ्याने ओढ दिलेली असतांना सर्वजण वरुणराजाची‌ प्रतीक्षा करीत आहेत. अशातच चित्रातील हिरवाईने नटलेला ग्रामीण भाग बघणाऱ्यांना प्रसन्न अनुभूती देतो. आल्हाददायक रंगसंगतीने ही चित्रे नटली आहेत.

   यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याध्यापक सुभाष चासकर, संगमनेरचे उद्योजक कैलास शेळके, डॉ. सुधाकर जगताप, कलासमीक्षक संजय देवधर, पी. एन.जी. च्या व्यवस्थापिका प्रविणा दुसाने आदी मान्यवर उपस्थित होते. त्यांनी कर्डक यांच्या कलेचे भरभरून कौतुक केले. मनोगताद्वारे संतोष कर्डक यांनी आपला कलाप्रवास उलगडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक साळवे यांनी केले. जगन्नाथ मुर्तडक यांनी आभार मानले. उदघाट्न समारंभाला कुटुंबीय, शिक्षक, कलारसिक मोठया  संख्येने उपस्थित होते.

     संतोष कर्डक यांनी आर्ट टीचर्स डिप्लोमा, आर्ट मास्टर व इंटेरिअर डिझाईनिंगचे शिक्षण घेतले आहे. अकोले तालुक्यातील साकिरवाडी येथील राजर्षी शाहू महाराज विद्यालयात कलाशिक्षक म्हणून ते विद्यार्थ्यांना कलेचे  मार्गदर्शन करतात.

आपली नोकरी सांभाळून त्यांची सातत्याने कलासाधना सुरु असते. जलरंग हे त्यांचे आवडते रंगमाध्यम असून निसर्गदृश्ये रंगवण्यात ते रंगून जातात. त्यातीलच अलीकडे रंगवलेली सुमारे ६० चित्रे प्रदर्शनात मांडण्यात आली आहेत. कळसूबाई  शिखर, भंडारदरा धरण, धबधबे, ग्रामीण दृश्ये, शेतीवाडी, पठार असे विषय रेखाटले आहेत. दि. ३० जूनपर्यंत हे निसर्गस्पर्श प्रदर्शन रसिकांसाठी सकाळी ११ ते संध्याकाळी ७.३० पर्यंत विनामूल्य खुले राहील.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विनामूल्य मैफल ! अफलातून म्युझिक लव्हर्सतर्फे सोमवारी सूरसम्राज्ञी लता मैफल !

"राजकारण गेलं मिशीत" या चित्रपटात उद्धव भयवाळ यांची लावणी !

इशरे नाशिक शाखेच्या नवीन कार्यकारिणीने केले पदग्रहण !