ग्रामसेवक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

ग्रामसेवक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

      नासिक::- आलोसे ग्रामसेवक गुलाब रामदास चौधरी, जामन्यापाडा ग्रामपंचायत, पंचायम समिती शिरपुर ता. जि. धुळे यांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने कारवाई करण्यात आली.

           तक्रारदार हे जामन्यापाडा ता शिरपुर येथील रहीवाशी असुन त्यांच्या आत्याचा जन्म दि.०१/०५/१९६८ रोजी मौजे जामन्यापाडा, ता. शिरपुर येथे झाला असुन त्यांचे आजोबा अशिक्षित असल्याने त्यांच्या जन्माची नोंद केली गेली नव्हती त्यांची जन्माची नोंद होणे करीता तक्रारदार यांची आत्याने शिरपुर येथील मे ज्युडीशिअल मॅजि वर्ग ०१ यांच्या न्यायालयात जन्माची नोंद होणे करीता फौजदारी किरकोळ अर्ज नं ४७२/२०२२ दाखल केला होता. सदर अर्जावर सुनावणी होवुन मा. न्यायालयाने तक्रारदार यांच्या आत्याची जन्माची दप्तरी नोंद घेणे बाबत दि.१४ आक्टो.२०२२ रोजी आदेश पारित केले आहेत. त्याप्रमाणे तकारदार यांनी आत्याच्या जन्माची दप्तरी नोंद होणे करीता दि. १६ मे रोजी ग्रामपंचायत कार्यालय, जामन्यापाडा येथे जावुन मा. न्यायलयाच्या आदेशांची प्रत जोडुन अर्ज ग्रामसेवक गुलाब चौधरी यांच्याकडे जमा केला होता. त्यावेळी त्यांनी तक्रारदार यांना त्यांच्या आत्याच्या जन्माची दप्तरी नोंद घेवुन जन्म दाखला देण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे १४००/- रूपये लेट फीच्या नावाखाली लाचेची मागणी केल्यांची तकारदार यांनी दुरध्वनी व्दारे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग धुळे कार्यालयास माहिती दिली होती. त्यावरून धुळे लाचलुचपत प्रतिबंधकाचे पथकाने जामन्यापाडा, ता. शिरपुर येथे जावुन तक्रारदार यांची तक्रार नोंदवून घेतली होती.
        सदर तक्रारीच्या अनुषंगाने पडताळणी केली असता पडताळणी दरम्यान ग्रामसेवक गुलाब रामदास चौधरी यांनी तक्रारदार यांच्याकडे त्यांच्या आत्याची जन्मांची नोंद घेण्यासाठी लेट फीच्या नावाखाली पंचसाक्षीदारा समक्ष १४००/- रु.लाचेची मागणी करून सदर लाचेची रक्कम ग्रामपंचायत कार्यालय, जामन्या पाडा, ता. शिरपुर येथे स्विकारतांना आलोसे गुलाब चौधरी यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.
 हॅश व्हॅल्यू घेण्यात आली असून फोटोग्राफ घेण्यात आले आहेत.
       सापळा  पर्यवेक्षण अधिकारी अभिषेक पाटील, पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि.धुळे, सापळा अधिकारी प्रकाश झोडगे, पोलीस निरीक्षक ला.प्र. वि.धुळे सहा.सापळा अधिकारी मंजितसिंग चव्हाण, पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि.धुळे, सापळा पथक राजन कदम,  शरद काटके, भूषण खलाणेकर, संतोष पावरा भूषण शेटे, रामदास बारेला, प्रशांत बागुल, मकरंद पाटील, प्रविण पाटील, मपोशी गायत्री पाटील, रोहिणी पवार वनश्री बोरसे, चालक सुधीर मोरे, जगदीश बडगुजर यांनी पोलिस अधीक्षक श्रीमती शर्मिष्ठा वालावलकर, वाचक पोलीस उपअधीक्षक,  नरेंद्र पवार, ला.प्र.वि
नाशिक परीक्षेत्र यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कारवाई करण्यात आली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।

निवडणूक लढवायची तर आधी शपथ घ्यावी लागते !

अखंड शारदोत्सवाची गोदातटाला परंपरा ! साहित्य संमेलन की महाविकास आघाडीचा राजकीय मेळावा ? असा प्रश्न साहित्यिक व नागरिकांना पडत आहे. संमेलन आणि वादांची मालिका काही संपत नाही अशाचप्रकारे नवनवे वाद समोर येत आहेत !! चित्रकलेच्या क्षेत्रात महनीय कामगिरी बजावलेले वासुदेवराव कुलकर्णी, शिल्पकलेत आपली नाममुद्रा कोरणारे मदन गर्गे, लोंढे बंधू, तांबट बंधू यांचा पुसटसाही उल्लेख नसल्याबद्दल कलाक्षेत्रात नाराजीचा सूर उमटतो आहे !!! सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!