माझं नाशिक, माझी चित्रेबुधवारी चित्रप्रदर्शन उदघाट्न !

माझं नाशिक, माझी चित्रे
बुधवारी चित्रप्रदर्शन उदघाट्न !

         नाशिक( वार्ताहर ) नाशिकला जलरंग  निसर्गचित्रणाची मोठी कलात्मक परंपरा लाभलेली आहे. चित्रमहर्षी वा. गो. कुलकर्णी यांनी जलरंगात प्रथम नाशिकचे वैभव रंगवले. त्यानंतर शिवाजी तुपे, पंडित सोनवणी, आनंद सोनार व पुढे अनेकांनी त्यात सुंदर चित्रांची भर घातली. या परंपरेतील चित्रकार बाळासाहेब पाटसकर यांच्या जलरंगातील 'माझे नाशिक, माझी चित्रे' या चित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवारी ( दि. ७) सायंकाळी ५.३० वाजता नाशिकरोडला स्टार झोन मॉलमध्ये पु. ना. गाडगीळ कलादालनात उदघाट्न होईल.

   चित्रकार बाळासाहेब पाटसकर यांनी जलरंग माध्यम वापरून नाशिक शहर व परिसरातील विविध ठिकाणची दृश्ये रंगवली आहेत. त्यातील सुमारे ५० चित्रांचा समावेश प्रदर्शनात करण्यात येणार आहे. ज्येष्ठ चित्रकार भी. रा. सावंत यांच्या हस्ते  उदघाट्न होईल. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध छायाचित्रकार व राज्य सांस्कृतिक धोरण समिती सदस्य प्रसाद पवार तसेच पु. ना. गाडगीळ आणि सन्सच्या 
शाखाव्यवस्थापिका प्रविणा दुसाने उपस्थित रहाणार आहेत. दि.१५ पर्यंत हे चित्रप्रदर्शन सकाळी ११ ते रात्री ८ पर्यंत रसिकांसाठी विनामूल्य खुले राहील. नाशिककर कलारसिकांनी उदघाट्न समारंभाला उपस्थित राहावे व प्रदर्शनाला आवर्जून भेट देऊन कलेचा आस्वाद घ्यावा असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

टिप्पण्या

  1. नाशिकचे रसिक पाहू शकतील पण मला आणि माझ्या सारख्या बाहेर गांवच्या लोकांना पाहता येणार नाही ही खंत वाटते , तरी आपण प्रदर्शन झाल्यावर व्हाटस् अपवर दाखवले तर आम्हाला आनंद होईल , आशा आहे आपण नाही म्हणणार नाही ,
    काशिनाथ भारंबे "निर्मोही"/ भुसावळ / मोबा 9272303212

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इशरे नाशिक शाखेच्या नवीन कार्यकारिणीने केले पदग्रहण !

"राजकारण गेलं मिशीत" या चित्रपटात उद्धव भयवाळ यांची लावणी !

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।