पोलिसाला लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने ताब्यात घेण्यात आले !

पोलिसाला लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने ताब्यात घेण्यात आले !
         नासिक::- आलोसे हरी जानू पालवी, पोलीस हवालदार, चांदवड पोलीस स्टेशन, ता. चांदवड, जि.नाशिक यांस १००००/- रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने ताब्यात घेण्यात आले. तक्रारदार यांचे त्यांच्या भावासोबत शेत जमिनीच्या वहीवाटीवरून वाद झाल्याने चांदवड पोलीस स्टेशन येथे तक्रारदार व त्यांच्या भावाचे एकमेकाविरुद्ध परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले होते. तक्रारदार यांच्याकडून दाखल झालेल्या गुन्ह्यात आरोपीतांविरुद्ध वाढीव कलम लावून आरोपींवर कारवाई करण्याकरिता तक्रारदार यांचे कडून पंचासमक्ष २००००/- रुपये लाचेची मागणी  करून त्यातील पहिला हप्ता रुपये १००००/- लाच रक्कम पंचांसमक्ष स्वीकारताना आलोसे रंगेहात मिळून आले म्हणून त्यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे . 

           
         सापळा अधिकारी मंजितसिंग चव्हाण, पोलीस  निरीक्षक, पर्यवेक्षण अधिकारी अभिषेक पाटील, पोलीस उपअधीक्षक, सापळा पथक राजन कदम, संतोष पावरा, रामदास बारेला, मकरंद पाटील, गायत्री पाटील, प्रवीण पाटील, चालक जगदीश बडगुजर ला.प्र.वि.धुळे यांनी सौ.शर्मिष्ठा घारगे-वालावलकर साो, पोलीस अधीक्षक, नरेंद्र पवार, वाचक पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कारवाई करण्यात आली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकअदालतीत १३ हजार २०४ प्रकरणे निघाली निकाली; तब्बल १२३ कोटींवर तडजोड शुल्क वसूल, मोटार अपघात प्रकरणात एकूण २५२ लाख रूपयांची तडजोड !

तालुका कृषी अधिकारी व कंत्राटी डाटा ऑपरेटर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

डॉ. कैलास हरिभाऊ कापडणीस (सर) यांच्या सेवापूर्ती कार्यक्रमाच्या निमित्ताने.... (प्रा. रोहित निकम यांनी व्यक्त केले मनोगत)