"लोकराजा" तपपूर्ती (१२व्या) दिवाळी अंकासाठी साहित्य पाठविण्याचे आवाहन !

"लोकराजा" तपपूर्ती (१२व्या) दिवाळी अंकासाठी साहित्य पाठविण्याचे आवाहन !

नासिक::- "लोकराजा" दिवाळी अंकासाठी साहित्य पाठविण्याचे आवाहन साप्ताहिक न्यूज मसालाचे संपादक नरेंद्र पाटील यांच्याकडून करण्यात आले आहे.
राष्ट्रीय विक्रम प्राप्त एकमेव दिवाळी विशेषांक तथा आंतरराष्ट्रीय दिवाळी अंक संघटना स्पर्धेत निवड व गौरव पुरस्कार तसेच काव्यमंच पुरस्कारासह अनेक मान्यवरांनी गौरविलेल्या, मुखपृष्ठावर आजी-माजी संसद सदस्याचे छायाचित्र प्रकाशित करण्यात येणारा "एकमेव" दिवाळी अंक "लोकराजा" !

         न्यूज मसाला चा "लोकराजा" दिवाळी अंक यंदा तपपूर्ती (१२ व्या) वर्षात पदार्पण करीत आहे. मराठी साहित्यिक विचारांचा गौरव व नव साहित्यिकांच्या लेखनाला यथोचित सन्मानाने स्थान देण्याचा मानस या वैशिष्ट्यांसह "लोकराजा" अंकाने सर्वदुर सहस्रावधी वाचकांची आवड जोपासली आहे. लेखक, कवी, विचारवंतानी आपण स्वत: लिहिलेली साहित्य कृती (कथा, कविता, ललित लेख यापैकी फक्त एकच साहित्य रचना ) खालील पत्यावर पोष्टाने किंवा ई-मेल १० जुलै २०२३ पर्यंत पाठवावे. कथा, कविता, लेख यांना विषयाचे बंधन नाही मात्र अश्लिलता विरहीत असावे. आपली भारतीय संस्कृति, चाली रिती जोपासणारे साहित्य अपेक्षित आहे . शब्दमर्यादा --
कथा १५००/३००० शब्द , लेख १००० शब्द, कविता १०० शब्द आहे, (विषयाच्या अनुषंगाने कमी जास्त, दिर्घ कथा यथोचित मर्यादा) आपली कोणतीही एक उत्कृष्ट साहित्य रचना पुढील पत्यावर पाठविण्याचे आवाहन करण्यात येत आहे, 
पत्ता - 
संपादक, न्यूज मसाला, लोकराजा दिवाळी अंक 
३०३, राॅयल होम्स, कॅनडा काॅर्नर, शरणपूर, नासिक, ४२२००२
किंवा
Email- newsmasala1@gmail.com
अधिक माहितीसाठी मो. 7387333801 वर संपर्क करावा. धन्यवाद ।

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नाशिकच्या जडणघडणीत मविप्रचा मोलाचा वाटा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मविप्र कृषी महाविद्यालयाच्या नूतन वास्तूचे दिमाखात उद्घाटन

सिडकोतील महिलांनी हेमंत गोडसे यांचे औक्षण करून दिल्या विजयीभव च्या शुभेच्छा !! तरुणांनी काढलेली मोटारसायकल रॅलीला उस्फुर्त प्रतिसाद !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

ईएसडीएस सॉफ्टवेअर सोल्युशन लिमिटेडच्या आयपीओला उत्तम प्रतिसाद - आयपीओच्या पहिल्याच दिवशी २.१ पट प्रतिसाद. इएसडीएस सॉफ्टवेअर सोल्यूशन लिमिटेड चा आयपीओ २८ ऑगस्ट २०२६ रोजी उघडला, प्रति इक्विटी शेअर किंमत पट्टा (Price Band) ₹४०८ ते ₹४२९ निश्चित (दर्शनी मूल्य ₹१ प्रति शेअर). • प्रति इक्विटी शेअर किंमतपट्टा ₹४०८– ₹४२९ निश्चित. •बोली/इश्यू उघडण्याची तारीख – २८ ऑगस्ट २०२६ आणि बोली/इश्यू बंद होण्याची तारीख – १ सप्टेंबर २०२६. • किमान बोली लॉट ३४ इक्विटी शेअर्स आणि त्यानंतर ३४ इक्विटी शेअर्सच्या पटीत