माझी वसुंधरा अभियानाची उत्कृष्ट अंमलबजावणी - आशिमा मित्तल यांचा सन्मान !सलग तिसऱ्या वर्षी जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना राज्यस्तरीय बक्षीस !!



माझी वसुंधरा अभियानाची उत्कृष्ट अंमलबजावणी - आशिमा मित्तल यांचा सन्मान !
सलग तिसऱ्या वर्षी जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना राज्यस्तरीय बक्षीस !!

न्यूज मसाला वृत्तसेवा नासिक ७३८७३३३८०१

           नाशिक: पंचतत्वाचे संवर्धन, संरक्षण व जतन करून शाश्वत विकास साधण्यासाठी सुरु केलेल्या 'माझी वसुंधरा ३.०' २०२२-२३ स्पर्धेतील मानकऱ्यांना मुंबई येथे पर्यावरण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्रयाच्या हस्ते गौरविण्यात आले. या अभियानात सलग तिस-या वर्षी नाशिक जिल्हयातील ग्रामपंचायतींनी राज्यस्तरीय बक्षिस मिळविले असून यावर्षी ३ ग्रामपंचायतींचा सन्मान करण्यात आला. इगतपुरी तालुक्यातील शिरसाठे ग्रामपंचायतीने राज्यात प्रथम तर नाशिक तालुक्यातील शिंदे व निफाड तालुक्यातील विंचूर ग्रामपंचायतीने वेगवेगळ्या गटात राज्यात तृतीय क्रमांक मिळवला. तसेच अभियानाची उत्कृष्ट अंमलबजावणी केल्याबद्दल जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांचाही सन्मान करण्यात आला.
               माझी वसुंधरा अभियाना सुरु झाल्यापासून या अभियानात राज्यस्तरीय पुरसकारामध्ये नाशिक जिल्हयाचा नावलौकिक राहिला आहे. पहिल्या वर्षी निफाड तालुकयातील पिंपळगाव बसवंत ग्रामपंचायतींने राज्यात प्रथम क्रमांक मिळवला तर दुसऱ्या वर्षी याच ग्रामपंचायतींने पुन्हा राज्यात प्रथम क्रमांक तर निफाड तालुक्यातील चांदोरी व इगतपूरी तालुकयातील शिरसाठे ग्रामपंचायतींने राज्यस्तरीय पुरस्कार मिळवला होता. अभियानाच्या या तिस-या जिल्हयाने उत्कृष्ट कामगिरी केली असून पर्यावरणपुरक गाव करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. यावर्षी शिरसाटे ( ता. इगतपुरी), विंचूर (ता. निफाड) आणि शिंदे (ता. नाशिक) या ग्रामपंचायतींनी राज्यस्तरीय पुरसकार प्राप्त केला आहे.
लोकसंख्या २ ते ५ हजार शिरसाठे ग्रामपंचायत राज्यात प्रथम आली असून लोकसंख्या ५ ते १० हजार शिंदे ग्रामपंचायत राज्यात तृतीय तर लोकसंख्या १० हजारापेक्षा जास्त विंचूर राज्यात तृतीय आली आहे. भूमी घटकाबाबत शिरसाठेला विशेष पुरस्कार पण मिळाला आहे. मुंबई येथील नरीमन पाँईंट जवळील टाटा थिएटर येथे आयोजित या कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हसते आज पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. 

           महाराष्ट्र शासनाच्या वतीने पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या वतीने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पर्यावरण संतुलनासाठी व रक्षणासाठी माझी वसुंधरा अभियान हाती घेण्यात आले आहे. पृथ्वी, वायू, जल, अग्नी, आकाश या पंचतत्वाच्या आधारे राबविण्यात येणा-या या अभियानात नाशिक जिल्हयातील सर्व  ग्रामपंचायतींनी सहभाग घेतला होता. माझी वसुंधरा ३.० मध्ये ० ते २५०० लोकसंख्या २५०० ते ५००० लोकसंख्या, ५००० ते १०००० लोकसंख्या आणि १० हजारांवरील लोकसंख्या असलेली गावे अशी विभागणी केली आहे.. यामध्ये ० ते २५०० लोकसंख्यागटात इगतपुरी तालुक्यातील शिरसाटे, ५ हजार ते १० हजार लोकसंख्या गटात नाशिक तालुक्यातील शिंदे, तर १० हजारांवरील लोकसंख्या या गटात निफाड तालुक्यातील विचूर ग्रामपंचायतीने बाजी मारली, तर उत्कृष्ट नियोजन म्हणून जिेल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांचा सन्मान करण्यात आला.

या अभियानांतर्गंत पंचतत्त्वाशी संबंधित घटकांवर काम करण्यात आले. यात पृथ्वी घटकासाठी वनीकरण, वनसंवर्धन, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी, जमिनीचे धुपीकरण थांबवणे, वायू तत्त्वासाठी प्रदूषण कमी करणे, हवेच्या गुणवत्तेत सुधारणा करणे, जल तत्त्वाशी संबंधित कामांमध्ये नदी संवर्धन, जलस्त्रोतांचे संवर्धन व संरक्षण तसेच नदी-नाले यांची स्वच्छता करणे, अग्नी तत्त्वानुसार उर्जेचा परिणामकारक वापर करणे, उर्जा बचत, अपव्यय टाळणे, अपारंपरिक उर्जेच्या निर्मितीसाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणे, आकाश तत्त्वातील स्थळ व प्रकाशाने मानवी स्वभावात होणार्या बदलांसाठी जनजागृती करणे यासारख्या पर्यावरणीय घटकांवर काम करण्यात आले. एप्रिल महिन्यात सर्व  ग्रामपंचायतींची काम शासनाच्या संकेतस्थळावर अपलोड करण्यात आली. सदर कामांची शासनाकडून डेस्कटॉप पडताळणी करण्यात आली यांनतर निवडक ग्रामपंचायतींची शासनाने नियुक्त केलेल्या त्रयस्थ संस्थेच्या वतीने प्रत्यक्ष पडताळणी करण्यात आली. आज पर्यावरण दिनानिमित्ताने मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात जिल्हयातील ग्रामपंचायतींचा सन्मान करण्यात आला.
          या कार्यक्रम वितरण सोहळयास जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी दिपक पाटील, ग्रामपंचायत विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र परदेशी, डॉ. वर्षा फडोळ, शिंदे ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक सुरेश भोजने, शिरसाठे ग्रामपंचातीचे सरपंच गोकुळ सदगीर, शिंदे गावचे सरपंच गोरख जाधव, विंचूरचे ग्रामविकास अधिकारी ग्यानदेव खैरनार, जिल्हा कक्षातील सल्लागार रविंद्र बाराथे, हर्षल देसाई आदि उपस्थ्ति होते. 
************************************
जिल्हयासाठी अभिमानाची व आनंदाची बाब-- आशिमा मित्तल, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद नाशिक
"माझी वसुंधरा अभियानात सलग तिस-या वर्षी जिल्हयाला ३ राज्यस्तरीय पुरस्कार मिळणे ही जिल्हयासाठी अभिमानाची व आनंदाची बाब आहे. जिल्हयात पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी व पर्यावरणसमृध्द गाव करण्यासाठी लोकसहभागातून चांगली काम करण्यात आली आहेत. स्वच्छ भारत अभियानांतर्गत सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाची कामे देखील करण्यात येत आहेत. अभियानासाठी निवड झालेल्या ग्रामपंचायतींना या अभियानात करावयाच्या कामांविषयी माहिती तसेच नियेाजन करुन देण्यात आले. सर्व गावांचे ‘गाव कृती आराखडे’ तयार करुन त्यानुसार अंमलबजावणी करण्यात आली. यापुढे देखील माझी वसुंधरा अभियानामध्ये जिल्हयात चांगले काम करुन  पर्यावरणपुरक गाव तयार करण्यासाठी नियोजन करण्यात येईल.
********************
पुढील वर्षासाठीचेही सूक्ष्म नियोजन करून व मोठ्या प्रमाणात लोकसहभाग घेऊन जास्तीत जास्त ग्राम पंचायतींना पुरस्कार मिळवण्याचे लक्ष आहे
           दिपक पाटील, 
 उप मुख्य कार्यकारी अधिकारी(पावस्व)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।

निवडणूक लढवायची तर आधी शपथ घ्यावी लागते !

अखंड शारदोत्सवाची गोदातटाला परंपरा ! साहित्य संमेलन की महाविकास आघाडीचा राजकीय मेळावा ? असा प्रश्न साहित्यिक व नागरिकांना पडत आहे. संमेलन आणि वादांची मालिका काही संपत नाही अशाचप्रकारे नवनवे वाद समोर येत आहेत !! चित्रकलेच्या क्षेत्रात महनीय कामगिरी बजावलेले वासुदेवराव कुलकर्णी, शिल्पकलेत आपली नाममुद्रा कोरणारे मदन गर्गे, लोंढे बंधू, तांबट बंधू यांचा पुसटसाही उल्लेख नसल्याबद्दल कलाक्षेत्रात नाराजीचा सूर उमटतो आहे !!! सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!