सहा. पोलिस उपनिरीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

 सहा. पोलिस उपनिरीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

          नासिक::- येवला तालुका पोलिस ठाण्यातील सहा. पोलिस उपनिरीक्षक विजय नारायण शिंदे, नाशिक ग्रामीण यांस लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने ताब्यात घेण्यात आले.


               तक्रारदार यांचे पत्नीने येवला तालुका पोलिस स्टेशन येथे दिलेल्या एनसी वरून सामनेवाले यांचेवार कारवाई करण्यासाठी व तक्रारदार त्यांच्या विरुद्ध दाखल असलेल्या एनसी व तक्रार अर्जानुसार दखलपात्र गुन्हा दाखल न करण्याचे मोबदल्यात बक्षीस म्हणून ४०००/- रुपये लाचेची मागणी  करून त्यातील पहिला हप्ता रुपये ३०००/- लाच रक्कम पंचांसमक्ष स्वीकारताना आलोसे रंगेहात मिळून आले म्हणून त्यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे .             
            सापळा अधिकारी वैशाली पाटील, पोलीस उप अधीक्षक, सापळा पथक पोना राजेश गिते, पोना शरद हेंबाडे, पोना अनिल राठोड यांनी सौ.शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, पोलीस अधीक्षक, नरेंद्र पवार, वाचक पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कारवाई करण्यात आली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकअदालतीत १३ हजार २०४ प्रकरणे निघाली निकाली; तब्बल १२३ कोटींवर तडजोड शुल्क वसूल, मोटार अपघात प्रकरणात एकूण २५२ लाख रूपयांची तडजोड !

तालुका कृषी अधिकारी व कंत्राटी डाटा ऑपरेटर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

डॉ. कैलास हरिभाऊ कापडणीस (सर) यांच्या सेवापूर्ती कार्यक्रमाच्या निमित्ताने.... (प्रा. रोहित निकम यांनी व्यक्त केले मनोगत)