पोलिस शिपाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

पोलिस शिपाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

     नासिक::- पोलिस शिपाई, तालुका पोलिस ठाणे, मालेगाव येथील करण गंभीर थोरात यांस लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने ताब्यात घेण्यात आले.

          यातील तक्रारदार यांचे बहिणीविरुद्ध  दारू बंधी कायद्या अंतर्गत मालेगाव तालुका पोलिस स्टेशन येथे गुन्हा नोद करण्यात आला होता.त्या गुन्ह्याच्या तपासात मदत करण्या करीता  तक्रारदार कडून  ४०००/- रुपये लाचेची मागणी  करून रुपये ४०००/- लाच रक्कम पंचांसमक्ष स्वीकारताना आलोसे रंगेहात मिळून आले म्हणून त्यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे .             
          सापळा अधिकारी- साधना बेलगावकर, पोलीस निरीक्षक, सापळा पथक पोह चंद्रशेखर मोरे, पोह पंकज पळशीकर, पोना दीपक पवार यांनी सौ.शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, पोलीस अधीक्षक, नरेंद्र पवार, वाचक पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कारवाई करण्यात आली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इशरे नाशिक शाखेच्या नवीन कार्यकारिणीने केले पदग्रहण !

"राजकारण गेलं मिशीत" या चित्रपटात उद्धव भयवाळ यांची लावणी !

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।