कायद्याने अशा आनंदी क्षणांना जगाशी सामायिक करू न शकणाऱ्या निराधार बालकांच्या चेहऱ्यावर पसरला वाढदिवसाचा आनंद ! The happy birthday is spread on the faces of destitute children who cannot share such happy moments with the world !

कायद्याने अशा आनंदी क्षणांना जगाशी सामायिक करू न शकणाऱ्या निराधार बालकांच्या चेहऱ्यावर पसरला वाढदिवसाचा आनंद !

       नाशिक ( प्रतिनिधी ) आपला वाढदिवस थाटामाटात साजरा व्हावा असं सगळ्यांनाच वाटतं. निराधार बालकांनाही आपला वाढदिवस केक कापून साजरा व्हावा असे वाटते पण कायद्याने असे आनंदी क्षण जगाला दाखवू शकत नाही यावर अडून न बसता त्यांच्या आनंदाच्या सीमा वृद्धींगत करायला हव्यात हेच लक्षात घेऊन अलीकडे आधाराश्रमात बालकांचा एकत्रितपणे वाढदिवस साजरा केला जातो. त्यामुळे त्यांच्याही चेहऱ्यावर मोठा झाल्याचा आनंद पसरतो. मे महिना अखेरीस ६ बालकांचे वाढदिवस साजरे झाले. केक, खाऊ व नृत्याने चिमुकले खुश झाले.

   राजकारण्यांच्या वाढदिवसाचा सर्वत्र भलीमोठी होर्डिंग्ज लाऊन गाजावाजा केला जातो. सर्वसामान्य माणसांचा सोशल मीडियावर वावर‌ वाढल्याने अनेक व्हॉट्सऍप ग्रुप्सवर, फेसबूकवर वाढदिवसाचे संदेश येतात. एकमेकांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या जातात.  घारपुरे घाटाजवळ आधाराश्रम ही संस्था ७० वर्षे अनाथ, निराधार बालकांच्या संगोपनाचे, पालनपोषणाचे काम करते. अनेक दानशूर वेळोवेळी देणग्या देतात. वस्तू - साहित्य स्वरूपात मदत करतात. काहीजण आपले, कुटुंबियांचे, मुलांचे वाढदिवस येथे येऊन अनाथ बालकांसमवेत साजरे करतात. ते बघून येथील मुलामुलींना असेच आपलेही वाढदिवस साजरे व्हावे असे वाटायचे. त्यांची ही भावना ओळखून अलीकडे दरमहा शेवटच्या दिवशी त्या त्या महिन्यातील बालकांचे वाढदिवस एकत्रितपणे साजरे केले जातात.

    मे महिन्याच्या अखेरीस मधुली, शिवन्न्या व नंदिनी यादव, साई शिर्के, रेश्मा पोटिंदे, मंगल या ६ बालकांचे वाढदिवस केक कापून साजरे झाले. मुला - मुलींनी हॅपी बर्थडे या गाण्यावर नाच करून आनंद द्विगुणित केला. मंगेश व मनीषा नाईक यांनी मुलांसाठी  केक, खाऊ, चॉकलेट प्रायोजित केले. यावेळी सचिव सुनीता परांजपे, कार्यकारी मंडळ सदस्या प्रतिभा बुरकुले, सल्लागार शुभदा बर्डे व कर्मचारी उपस्थित होते. जिजा चौधरी आधाराश्रमात ३० वर्षे निरलस सेवा करून सेवानिवृत्त झाल्या. त्याबद्दल संचालक मंडळातर्फे त्यांचा सत्कार करून भावपूर्ण निरोप देण्यात आला. वाढदिवसाचा उपक्रम यापुढेही  कायमस्वरूपी सुरु रहाणार आहे. त्यासाठी देणगीदारांनी कार्यवाह हेमंत पाठक यांच्याशी ९९२३२८७१०३ किंवा ( ०२५३) २५८०३०९ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अद्वितीय शास्त्रज्ञ तथा विसाव्या शतकातील महान शास्त्रज्ञ : सर आयझॅक न्यूटन. ४ जानेवारी जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याचा घेतलेला थोडक्यात आढावा वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

सेवानिवृत्त होत असणाऱ्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकाच्या पत्नीचे त्यांच्या आयुष्य भरातील चढ उतार तसेच जडणघडणा विषयीचा लेखाजोखा स्वरूपात मनोगत.... पत्थर खाकर भी खडे रहे! वो लहू बनकर अडे रहे ! जब दुनिया जश्न मनाती है ! तब पुलिस फर्जं निभाती है ! सविस्तर मनोगत वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

मूर्तिकार कारागीरांसाठी कौशल्य विकास आणि उद्योग मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न !