वरिष्ठ लिपिक ४५००० रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

वरिष्ठ लिपिक ४५००० रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !
 
    नासिक::- नंदुरबार येथील दी.एन.डी.अॅण्ड एम.वाय.सार्वजनिक हायस्कूल मधील वरिष्ठ लिपिक विनोद साकरलाल पंचोली यांस ४५०००/- रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने ताब्यात घेण्यात आले.

              यातील तक्रारदार यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानंतर त्यांच्या रजा रोखिकरणाची रक्कम आलोसे यांनी दिलेल्या धनादेशाद्वारे तक्रारदार यांच्या बँक खात्यात जमा झाली होती. तक्रारदार यांची रजा रोखीकरणाची रक्कम काढून दिल्याबद्दलच्या मोबदल्यात आलोसे विनोद पंचोली यांनी तक्रारदार यांच्याकडून ४५०००/- रुपये लाचेची मागणी करून ,  आज दिनांक २१ जून २०२३ रोजी सदर लाचेची रक्कम पंच साक्षीदार यांचे समक्ष स्वीकारली आहे. नवापुर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
            सापळा अधिकारी राकेश आ. चौधरी, पो. उपअधीक्षक, ला.प्र.वि. नंदुरबार, सापळा कार्यवाही पथक पोहवा/विलास पाटील, पोहवा/ज्योती पाटील, पोना/देवराम गावित, पोना/अमोल मराठे, सापळा मदत पथक समाधान एम.वाघ, पोलीस निरीक्षक, पोहवा/विजय ठाकरे, पोना/संदीप नावडेकर, चापोना/जितेंद्र महाले सर्व नेमणूक अँटी करप्शन ब्युरो, नंदुरबार यांनी श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर मॅडम, पोलीस अधीक्षक, माधव रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक, नरेंद्र पवार, वाचक पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कारवाई करण्यात आली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विनामूल्य मैफल ! अफलातून म्युझिक लव्हर्सतर्फे सोमवारी सूरसम्राज्ञी लता मैफल !

"राजकारण गेलं मिशीत" या चित्रपटात उद्धव भयवाळ यांची लावणी !

इशरे नाशिक शाखेच्या नवीन कार्यकारिणीने केले पदग्रहण !