In the network of the Headmaster and Junior Clerk, along with the Chairman of the Educational Institute ! शैक्षणिक संस्थेच्या अध्यक्षासह मुख्याध्यापक व कनिष्ठ लिपिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

In the network of the Headmaster and Junior Clerk, along with the Chairman of the Educational Institute !
शैक्षणिक संस्थेच्या अध्यक्षासह मुख्याध्यापक व कनिष्ठ लिपिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !
        नासिक::- महात्मा फुले हायस्कुल, एरंडोल ता.एरंडोल जि.जळगाव येथील मुख्याध्यापक विनोद शंकर जाधव, कनिष्ठ लिपीक नरेंद्र उत्तम वाघ व श्री. सावता माळी शिक्षण प्रसारक मंडळ, जळगाव संचलीत महात्मा फुले हायस्कुल चे अध्यक्ष विजय पंढरीनाथ महाजन, एरंडोल ता.एरंडोल जि.जळगाव यांना मुख्याध्यापक यांचे नांवे असलेला धनादेश स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने ताब्यात घेण्यात आले.

          यातील तक्रारदार हे श्री.सावता माळी शिक्षण प्रसारक मंडळ, जळगाव संचलीत महात्मा फुले हायस्कुल, एरंडोल येथे उप शिक्षक या पदावर कार्यरत आहेत. सदर संस्थेने तक्रारदार यांची व त्यांचे उप शिक्षक या पदावर कार्यरत असलेले सहकारी मित्र अशा दोघांची बदली दि.०१/०४/२०२३ रोजी एरंडोल हायस्कूल येथून महात्मा फुले हायस्कुल, धरणगाव येथे करण्यात आल्या बाबतचा मंजुरीसाठीचा प्रस्ताव दि.०२/०५/२०२३ रोजी शिक्षणाधिकारी, माध्यमिक शिक्षण विभाग, जिल्हा परिषद जळगाव यांचे कडे पाठविलेला होता. सदर तक्रारदार यांची व त्यांचे सहकारी उप शिक्षक मित्र अशा दोघांची बदलीस स्थगिती मिळणेसाठी व पाठवलेला मंजुरी प्रस्ताव रद्द करण्यात यावा अशा आशयाचे संस्थेचे पत्र शिक्षणाधिकारी, माध्यमिक शिक्षण विभाग, जिल्हा परिषद जळगाव यांचे नावे देण्याच्या मोबदल्यात आलोसे मुख्याध्यापक व कनिष्ठ लिपिक यांनी तक्रारदार यांचेकडे व त्यांचे सहकारी उप शिक्षक यांचेकडे पंचासमक्ष स्वतःसाठी व संस्थेच्या अध्यक्षांसाठ दोघांचा पुर्ण महिन्याचा एक पगार म्हणजेच तक्रारदार यांना ७५,०००/-रुपये धनादेश स्वरूपाने लाचेची मागणी करून ती धनादेश स्वरूपात घेणार असल्याचे सांगितले व संस्थेचे अध्यक्ष यांनी कनिष्ठ लिपिक यांच्या मोबाईल फोनवरून तक्रारदार यांना मुख्याध्यापक व कनिष्ठ लिपिक यांनी सांगितल्याप्रमाणे पूर्तता करण्यास सांगून प्राप्त करण्याचा प्रयत्न करून प्रोत्साहन दिले. व मागणी केल्याप्रमाणे ७५,०००/-रू. चा धनादेश मुख्याध्यापक यांचे नावे असलेला महात्मा फुले हायस्कुल, एरंडोल येथे स्वतः स्विकारतांना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. त्यांचे वर एरंडोल पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात येत आहे.
           सापळा पर्यवेक्षक शशिकांत पाटील, पोलिस उप अधीक्षक, सापळा व तपास अधिकारी एन.एन.जाधव, पोलिस निरीक्षक, सापळा पथक पो.हे.कॉ.सुनिल पाटील, पो.हे.कॉ.रविंद्र घुगे, पो.ना.ईश्वर धनगर, पो.कॉ.सचिन चाटे, कारवाई मदत पथक एस.के.बच्छाव, पोलिस निरीक्षक, स.फौ.दिनेशसिंग पाटील, स.फौ.सुरेश पाटील, म.पो.हे.कॉ. शैला धनगर, पो.ना.किशोर महाजन, पो.ना.सुनिल वानखेडे, पो.ना.बाळु मराठे, पो.कॉ.प्रदिप पोळ, पो.कॉ.राकेश दुसाने, पो.कॉ.अमोल सुर्यवंशी, पो.कॉ.प्रणेश ठाकुर यांनी श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, पोलीस अधीक्षक, माधव रेड्डी अप्पर पोलिस अधिक्षक, नरेंद्र पवार, वाचक पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कारवाई करण्यात आली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विनामूल्य मैफल ! अफलातून म्युझिक लव्हर्सतर्फे सोमवारी सूरसम्राज्ञी लता मैफल !

"राजकारण गेलं मिशीत" या चित्रपटात उद्धव भयवाळ यांची लावणी !

इशरे नाशिक शाखेच्या नवीन कार्यकारिणीने केले पदग्रहण !