कवी हेमंत मुसरीफ, पुणे यांच्या आषाडीनिमित विठूराया चरणी शब्दबद्ध केलेल्या दोन रचना !
कवी हेमंत मुसरीफ, पुणे यांच्या आषाडीनिमित विठूराया चरणी शब्दबद्ध केलेल्या दोन रचना !
विठू व्यापार ..
का करतोस विठ्ठला
तू घाट्याचा व्यापार !
करी मी अल्प भक्ती
कसे देशी अपरंपार !!
नामस्मरण रे स्मरण
घे कधी तर एकवार !
सावरला तोल माझा
अनेकदा कैक वार !!
दुरुनि लाजत लपत
करी हळूचं नमस्कार !
झोळी मध्ये भरे खूप
श्रीहरी तव चमत्कार !!
भावमाझा चोख नसे
मनात दडले विकार !
तू देशी निखळ सुख
कशी ना तुझी तक्रार !!
मीचंतुझा भक्त खरा
सजवला भ्रमबाजार !
मिस्किल हसतकसा
घालवला तू आजार !!
हजार शंका उधार
अर्पिता तुजला हार !
आप पर भेद न तुज
रोख पंढरी व्यवहार !!
*************************************
गावातूनि येतेजाते
पंढरीनाथांची वारी !
स्वागतासज्ज होई
पंचक्रोशी ती सारी !!
हो चकाचक नगरी
सजली नववधूपरि !
भक्तांच्या डोळ्यांत
हरि स्नेहाची झारी !!
विसरून भेदा भेद
कामी रमती सारी !
खुश हवे वारकरी
इच्छा ही राहे उरी !!
चाले भजन किर्तन
टाळ मृदगां गजरी !
आषाढमासी कशी
दिवाळी ही साजरी !!
हरि भक्त वारकरी
चला होऊ सेवेकरी !
वारकरी रूपांमध्ये
आले हरी जणूं घरी !!
स्वता नगरी पंढरी
गावा मध्ये अवतरी !
आषाढी एकादशी
संपन्न होई परोपरी !!
- हेमंत मुसरीफ पुणे
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा