कवी प्रशांत धिवंदे यांची विठ्ठल वारी रचना !


कवी प्रशांत धिवंदे यांची विठ्ठल वारी रचना !


आषाढी एकादशी

आज एकादशी । आषाढ मासाची ।।
आस दर्शनाची । लागे मनी  ।। १।।

घेऊन पालख्या । आले वारकरी ।।
मुखी नाम हरी। जपताती  ।।२।।

माता-भगिनींच्या । डोईला तुळस ।।
चालण्या आळस । नसे कोणा  ।।३।।   

वाजविती टाळ । मुखाने गजर ।।
भक्तीचा हा ज्वर । चढलासे  ।।४।।  

भक्तीमध्ये तुझ्या । वारकरी दंग ।।
गाताती अभंग । मनोभावे  ।।५।।

वारीत साऱ्यांची । जोडलिया नाळ ।।
करिसी सांभाळ । विठू तूची  ।।६।।

दर्शनासी तुझ्या । चंद्रभागा काठी ।।                
झाली बघ दाटी । पांडुरंगा  ।।७।।

मना खुणावते । रूप मनोहरी ।।
फळा येई वारी । दर्शनाने  ।। ८ ।।

रचना - प्रशांत र. धिवंदे
देवळाली कॅम्प, नाशिक

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत नासिक जिल्ह्यास ‘आदीकर्मयोगी अभियान’ अंतर्गत राज्यातील सर्वोत्तम कामगिरीचा सन्मान

हाॅटेल यात्री, Hotel yatri

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।