Senior technician in the network of bribery department while accepting bribe of Rs. 30000 ! वरिष्ठ तंत्रज्ञ ३०००० रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

वरिष्ठ तंत्रज्ञ ३०००० रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !
       नासिक::- विद्युत उप केंद्र जोरण ता. सटाणा येथील वरिष्ठ तंत्रज्ञ हेमंत विठ्ठल खैरनार उर्फ पप्पू यांस ३०००० रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने ताब्यात घेण्यात आले.

          तक्रारदार हे शेतकरी असून त्यांचे शेता जवळील सार्वजनिक डीपी जळाल्याने शेतातील डाळिंब बागेचे पाण्याशिवाय नुकसान होत असल्याने वायरमन पप्पू खैरनार यांनी शेतीसाठी सार्वजनिक इलेक्ट्रिक नवीन डीपी बसवून देण्याचे मोबदल्यात ३००००/- रुपये व केबल लावण्याचे मोबदल्यात २०००/- रुपये असे एकूण ३२०००/- रुपये लाचेची मागणी करून तडजोडी अंती ३० हजार रुपये स्वीकारल्याने त्यांना रंगेहात पकडण्यात आले असून त्यांचेवर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.
          सापळा अधिकारी श्रीमती साधना इंगळे, पोलीस निरीक्षक, सापळा पथक पो.हवा.सचिन गोसावी, पो.हवा. प्रफुल्ल माळी, चा.पो.हवा. विनोद पवार यांनी श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, पोलीस अधीक्षक, नरेंद्र पवार वाचक, पोलीस उपअधीक्षक, पोलीस अधीक्षक कार्यालय, ला.प्र.वि. नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कारवाई करण्यात आली.

टिप्पण्या

  1. खोटी बातमी आहे फिर्यादि ने बदला घेण्याच्या भावनेतून फसवले आहे सदर मागणी ही बिल भरण्यासाठी केली गेली होती तसा जबाब पूर्ण गावाने आणी DP वरील सर्व शेतकऱ्यांने दिला आहे.फिर्यादी हा माथेफिरू आहे याआधी त्याने त्याच्या भावावर आरोप केला आहे आपल्या पत्नीसोबत अनैतिक संबध असल्याचा

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नाशिकच्या जडणघडणीत मविप्रचा मोलाचा वाटा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मविप्र कृषी महाविद्यालयाच्या नूतन वास्तूचे दिमाखात उद्घाटन

मुंबई-धुळे मार्गिका खुली, वाहतुकीला दिलासा !

ईएसडीएस सॉफ्टवेअर सोल्युशन लिमिटेडच्या आयपीओला उत्तम प्रतिसाद - आयपीओच्या पहिल्याच दिवशी २.१ पट प्रतिसाद. इएसडीएस सॉफ्टवेअर सोल्यूशन लिमिटेड चा आयपीओ २८ ऑगस्ट २०२६ रोजी उघडला, प्रति इक्विटी शेअर किंमत पट्टा (Price Band) ₹४०८ ते ₹४२९ निश्चित (दर्शनी मूल्य ₹१ प्रति शेअर). • प्रति इक्विटी शेअर किंमतपट्टा ₹४०८– ₹४२९ निश्चित. •बोली/इश्यू उघडण्याची तारीख – २८ ऑगस्ट २०२६ आणि बोली/इश्यू बंद होण्याची तारीख – १ सप्टेंबर २०२६. • किमान बोली लॉट ३४ इक्विटी शेअर्स आणि त्यानंतर ३४ इक्विटी शेअर्सच्या पटीत