आषाढी स्पेशल (१९), अरूण देशपांडे लिखित "वारीचे अभंग" नाम ओठांवरी भक्तीदीप अंतरी !
आषाढी स्पेशल (१९), अरूण देशपांडे लिखित "वारीचे अभंग" नाम ओठांवरी भक्तीदीप अंतरी !
आषाढी एकादशी निमिताने-
!! वारीचे अभंग !!
वारीची हो वाट
नसते बिकट
दुष्कर जी वाट
ती सहज ।। १ ।।
आली वारी वारी
चंद्रभागा तीरी
पाही वारकरी
पांडुरंगा ।। २ ।।
रामकृष्ण हरी
पांडुरंग हरी
वासुदेव हरी
जयघोष ।। ३ ।।
नाम ओठांवरी
भक्तीदीप अंतरी
जय हरी श्रीहरी
पांडुरंगा ।। ४ ।।
विठ्ठला पाहुनी
अश्रू हो लोचनी
सुख मनोमनी
म्या पामरा ।। ५ ।।
__अरुण वि.देशपांडे
पुणे
जय हरी श्रीहरी अरुणराव आजच्या आषाढीच्यानिमित्ताने केलेले कवन खूपच मनभावन
उत्तर द्याहटवाधन्यवाद सर जी
हटवा